Suryakumar Won ICC Award : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा जिंकला ‘ICC T20 प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार

Suryakumar Won ICC Award : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा जिंकला ‘ICC T20 प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Won ICC Award : भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची ICC ने 2023 सालचा T20 प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. सूर्यकुमारला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. याआधी आयसीसीने आपल्या सर्वोत्कृष्ट टी-20 संघात सूर्यकुमारचा समावेश करून त्याला कर्णधार बनले आहे. सलग दोनदा सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडू ठरलेला सूर्या हा पहिला खेळाडू आहे. त्याने झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, युगांडाचा अल्पेश रमाझानी आणि न्यूझीलंडचा मार्क चॅपमन यांना मागे टाकत या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. याआधी 2022 मध्ये सूर्याला हा पुरस्कारही मिळाला होता.

सूर्यकुमारने 2023 मध्ये 50 च्या सरासरीने आणि 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. गेल्या वर्षभरात त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 वर्चस्व कायम ठेवले. आपल्या स्फोटक खेळीच्या जोरावर त्याने भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. सूर्याने गेल्या वर्षी 17 डावांत 733 धावा फटकावल्या. या काळात त्याची सरासरी 48.86 आणि स्ट्राइक रेट 155.95 होता. (Suryakumar Won ICC Award)

बास डी लीडे याचीही लक्षवेधी कामगिरी

नेदरलँडचा वेगवान गोलंदाज बास डी लीडेची आयसीसी असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार जिंकणारा तो डच संघाचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी रायन टेन डुस्केटने तीनदा (2008, 2010 आणि 2011) हा पुरस्कार जिंकला आहे.

क्विंटर एबेलचा विक्रम

महिला गटात केनियाची महिला क्रिकेटपटू क्विंटर एबेल हिची आयसीसी असोसिएट प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. आयसीसीचा पुरस्कार जिंकणारी ती पहिली केनियन महिला खेळाडू ठरली आहे. केनियाचा पुरुष खेळाडू थॉमस ओडोयो याने 2007 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. एबेल ही एकमेव सहयोगी खेळाडू (पुरुष/महिला) आहे जिने 1000 पेक्षा जास्त धावा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 50 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news