Suryakumar Yadav : सूर्यकुमार इज बेस्ट! ICC च्या ‘या’ पुरस्कारावर उमटवली मोहोर

Suryakumar Yadav : सूर्यकुमार इज बेस्ट! ICC च्या ‘या’ पुरस्कारावर उमटवली मोहोर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : suryakumar yadav : भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव याची आयसीने (ICC) 2022 चा सर्वोत्कृष्ट टी-20 क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅकग्राला 2022 च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2022 मध्ये, सूर्याने 31 टी-20 सामन्यांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या होत्या. एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 1000 पेक्षा जास्त धावा करून धुमाकुळ घालणाऱ्या सूर्यकुमारला आयसीसीने एकप्रकारे सलामच केला आहे.

सुर्याने या शर्यतीत इंग्लंडच्या सॅम कुरेन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा पराभव केला. सध्याच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्या नंबर-1 फलंदाज आहे. त्याचे सध्या 908 गुण आहेत. तो टी-20 मध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा भारतीय फलंदाज बनला आहे. गेल्या वर्षीच तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. सूर्याने 2023 ची सुरुवातही धमाकेदार केली आहे. आता त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेटर ऑफ द इयर चा पुरस्कार पटकावून भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

दोन शतके नावावर

सूर्यकुमारने गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली. पहिले शतक इंग्लंडमध्ये तर दुसरे शतक न्यूझीलंडच्या भूमीवर झळकावले. तसेच त्याच्या खात्यात 9 अर्धशतकेसुद्धा जमा आहेत. यादरम्यान त्याने 68 षटकार ठोकून एका वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचाही हा विक्रम नोंदवला आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याच्या बॅटने स्फोटक खेळी साकारल्या होत्या. त्याने 6 डावात तीन अर्धशतके फटकावली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट सुमारे 190 आणि सरासरी 60 होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news