७१ टक्‍के भारतीयांची ‘वर्क फॉर्म होम’ला पसंती, अधिक वेतनापेक्षा कामातील लवचिकतेला प्राधान्‍य

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : २०२० वर्ष आलं आणि त्‍याबरोबर कोरोना नावाचं महासंकट संपूर्ण जगावर ओढावलं. हे संकट एवढं मोठं होतं की, आपल्‍या जगण्‍याची शैलीच बदलली. कोरोना प्रतिबंधासाठी सामाजिक अंतर ( सोशल डिस्टंसिंग ) राखणे अनिवार्य होतं. त्‍यामुळे शाळांमध्‍ये मुलांना ऑनलाईन शिक्षण सुरु झालं तर जेथे शक्‍य आहे तेथे  कर्मचार्‍यांना वर्क फॉर्म होम (घरातून कामकाज करणे) ही संकल्‍पना सुरु झाली. काही क्षेत्रांमध्‍ये विशेषत: माहिती आणि तंत्रज्ञान ( IT)क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. दोन वर्षांमध्‍ये कोरोनाच्‍या महासंकटावर आपण मात केली. पुन्‍हा जनजीवन सुरळीत झालं आहे. मात्र भारतात वर्क फॉर्म होम ही संकल्‍पान चांगलीच रुजल्‍याचं दिसतंय. नवीन सर्वेक्षणात असे आढळलं आहे की, ७१ टक्‍के भारतीय कर्मचारी हे वर्क फॉर्म होमला ( Work From Home Jobs ) प्राधान्‍य देत आहेत. विशेषत: उच्‍च वेतनापेक्षा लवचिक कामाचे तास निवडण्‍यास त्‍यांचे प्राधान्‍य आहे. तसेच नाेकरी शाेधताना भारतीयांचा दृष्‍टीकाेन बदलला आहे. जाणून घेवूया या नवीन सर्वेक्षणाविषयी…

'सीएनबीसी'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, Indeed द्वारे केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ७१ टक्के भारतीय व्यावसायिक नोकरीच्या संधींचे मूल्यांकन करताना लवचिकतेला प्राधान्य देत आहेत. भारतात नोकरीच्‍या शोधात असणार्‍यांमध्‍ये लवचिकता वाढत आहे. कामाचे स्थान आणि कामातील लवचिकतेला प्राधान्‍य दिले जात आहे.

जगभरातील कार्यालयातील व्‍यवस्‍था पुन्‍हा पूर्वपदावर आली आहे. यासाठी कार्यालयांकडून प्रोत्‍साहनही दिले जात आहे. बहुतांश भारतीय जे आजही वर्क फॉर्म होममध्‍ये काम करत आहेत ते पुन्‍हा पाच दिवसांच्‍या कार्यालयीन कामकाज आठवडा ही  कार्यपद्धती  सुरु करण्‍याबाबत उदासीन असल्‍याचे Indeed इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार यांनी सांगितले.

Work From Home Jobs : भारतीयांचा नोकरी शोधताना दृष्‍टीकोन बदलला आहे

Indeed द्वारे केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, सध्या कार्यरत असलेल्या ७१ टक्के व्यक्तींनी सक्रियपणे नोकरीच्या संधी शोधल्या आहेत. यामध्ये त्‍यांनी वर्क फॉर्म होमला प्राधान्‍य दिले आहे. तसेच त्यांनी एकाचवेळी अनेक कामे करण्‍याचीही तयारी सुरु केले आहेत. TCS मध्‍ये 'ऑफिस रिटर्न' या घोषणेनंतर अनेक महिला कर्मचाऱ्यांवर लक्षणीय परिणाम होऊन मोठ्या संख्येने राजीनामे आले. भारतातील नोकरी शोधणार्‍यांचा दृष्टीकोन आता बदलत आहे, असेही शशी कुमार यांनी CNBC ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

६३ टक्‍के कर्मचारी 'दाेन्‍ही' पर्यायांना पसंती

६३ टक्‍के कर्मचारी हे वर्क फॉर्म होम आणि काही दिवस कार्यालयीन काम याला प्राधान्‍य देताना दिसत आहेत. ज्यामुळे त्यांना विशिष्ट दिवशी घरातून कामकाज करणे आणि इतर दिवशी कार्यालयातून काम करण्याची परवानगी मिळते. सर्वेक्षण असेही आढळले की, सध्‍या हायब्रिड काम व्यवस्था स्‍वीकारण्‍यास लक्षणीय वाढ झाली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news