Suruchi Adarkar : सुरुची अडारकरचे पुनरागमन या मालिकेतून होणार

सुरुची अडारकर
सुरुची अडारकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'का रे दुरावा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरुची अडारकरचे पुन्हा झी मराठीवर पुनरागमन होत आहे. सुरुचीने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका त्यावेळी खूप गाजली होती. आता सुरुची झी मराठीवरील मालिकेतून पुन्हा (Suruchi Adarkar ) पुनरागमन करत आहे. या मालिकेचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यामध्ये तिची भूमिका ग्लॅमरस असणार आहे. (Suruchi Adarkar)

सुरुची अडारकरने डिसेंबरमध्ये बांधली होती लग्नगाठ

सुरुची अडारकरने ६ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली होती. तिने अभिनेता पियुष रानडेसोबत विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. काही व्हिडिओदेखील पाहायला मिळताहेत.

सुरुची-पियुषने लग्नातील अनेक आनंदाचे क्षण व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात. मेहंदी, हळद, सप्तपदी, आणि उखाणा असा तिचा लग्नाचा प्रवास फोटो आणि व्हिडिओंमधून पाहायला मिळतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news