Supriya Sule on Reservation: आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ या विषयावर चर्चा व्हावी- सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

Supriya Sule on Reservation
Supriya Sule on Reservation

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात 'आरक्षण' हा विषय चर्चेसाठी मांडावा. तसेच यासाठी वेळ द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली आहे. या मागणी संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून शेअर केली आहे. (Supriya Sule on Reservation)

सुप्रिया सुळे यांनी आपल्‍या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असूनदेखील या समाजघटकांचे आरक्षणाचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. परिणामी या आरक्षणाच्या मुद्द्यावरून या समाजात प्रचंड अस्वस्थता आहे. या प्रश्नावरून अनेक तरुणांनी आपलं जीवन संपवले आहे.  ही मोठी त्रासदायक परिस्थिती आहे. आरक्षणाचे हे विषय सभागृहात मांडले जाऊन ते मंजूर होणे आवश्यक आहे. म्हणून लोकसभा अध्यक्षांनी आगामी अधिवेशनात आरक्षणाचा विषय मांडून त्यावर चर्चा करावी, अशी विनंती खासदार सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. (Supriya Sule on Reservation)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news