Supreme Court : दिल्लीतील अध्यादेशाच्या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र )
सर्वोच्‍च न्‍यायालय (संग्रहित छायाचित्र )

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 10, Supreme Court : दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबतच्या अध्यादेशाच्या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. अध्यादेशाला आक्षेप घेत अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारने याचिका दाखल केलेली आहे. उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनाही न्यायालयाने पक्षकार बनवत नोटीस पाठवली आहे.

अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांचा विषय मागील काही काळापासून प्रतिष्ठेचा बनलेला आहे. अध्यादेशाला स्थगिती देण्याच्या आप सरकारच्या विनंतीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नाही, मात्र केंद्र सरकारला यावरुन नोटीस बजावण्यात आली आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये आप सरकारने चारशे सल्लागार नेमले होते. त्याला उपराज्यपालांनी स्थगिती दिली होती. या मुद्यावरुनही आप सरकारला तूर्त दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news