नाशिक पुरवठा विभाग : अंत्योदय शिधापत्रिकाधारक मोफत साडी वितरण सुरु

नाशिक पुरवठा विभाग : अंत्योदय शिधापत्रिकाधारक मोफत साडी वितरण सुरु
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशन दुकानांमधून मोफत साडी वितरणास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत ६० हजार ५१५ कुटुंबांना साडी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, लाभार्थी कुटुंबांकडून अमुक एका रंगाच्या साडीसाठी आग्रह धरला जात असल्याने रेशन दुकानदार हैराण झाले आहेत.

शासनाने राज्यातील अंत्योदय रेशनकार्डधारक लाभार्थींना वर्षभरातून एकदा मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशन दुकानांमधून या साड्यांचे वितरण केले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ५१५ अंत्योदय रेशनकार्डधारक आहे. या सर्व कुटुंबांसाठी राज्यस्तरावरून साड्या उपलब्ध झाल्या आहेत. लाल, हिरवा, पिवळा व निळ्या अशा चार रंगांत या साड्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार ६०९ रेशन दुकानांमधून या साड्या आता वितरित करायला सुरुवात झाली आहे. (Nashik Free sarees for Antyodaya ration card holders, Supply Division Nashik)

येत्या १० दिवसांमध्ये लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आचारसंहितेत साडी वाटप अडकणार आहे. त्यामुळेच साड्या उपलब्ध झाल्यानंतर तातडीने त्या लाभार्थी कुटुंबांना वितरित कराव्यात, अशा सूचना पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. परंतु, साड्या घेण्यासाठी दुकानात येणाऱ्या लाभार्थींकडून विशेषत: महिलावर्गाकडून साड्यांच्या रंगासाठी आग्रह धरला जात आहे. प्रसंगी लाभार्थीकडून वादाचेही प्रसंग उभे ठाकत आहेत. त्यामुळे मोफतचे साडी वितरण हे दुकानदारांसाठी अडचणीचे ठरते आहे. (Nashik Free sarees for Antyodaya ration card holders, Supply Division Nashik)

उपलब्ध साड्या
बागलाण 13116, चांदवड 6227, देवळा 5091, दिंडोरी 13144, धाविअ मालेगाव 16606, धाविअ नाशिक 105914, इगतपुरी 10688, कळवण 8651, मालेगाव 11235, नांदगाव 5271, मनमाड 3305, नाशिक 8627, निफाड 10831, पेठ 10842, सिन्नर 8065, सुरगाणा 15327, त्र्यंबकेश्वर 8884, येवला 10051.

अंत्योदय कार्डधारकांना माेफत साड्या वाटप करताना साड्यांच्या रंगासाठी आग्रह धरला जातोय. तसेच प्राधान्य रेशनकार्डधारकही साड्यांसाठी वाद घालत आहेत. शासनाने सरसकट प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना साड्यांचे वितरण करून रेशन दुकानदारांना दिलासा द्यावा. – निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार संघटना.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news