Super Computer Predicts : सुपर कॉम्‍पुटरची भाकणूक; मेस्सी उंचावणार अर्जेटिनासाठी वर्ल्ड कप ट्रॉफी

Super Computer Predicts : सुपर कॉम्‍पुटरची भाकणूक; मेस्सी उंचावणार अर्जेटिनासाठी वर्ल्ड कप ट्रॉफी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कतारमध्ये २० नोव्‍हेंबरपासून होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची चर्चा आतापासूनच चाहत्‍यांमध्‍ये होत आहे. २० नोव्‍हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होणार्‍या स्‍पर्धेत ३२ संघ सहभागी होतील. फुटबॉलचा विश्‍वविजेता कोण होणार? या प्रश्‍नावर  फुटबॉल प्रेमींमध्‍ये खल सुरु आहे. तसेच अर्जेटिनाचा स्‍टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्‍या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण मेस्‍सीचा हा अखेरचा विश्‍वचषक असणार आहे. या स्‍पर्धेत कोणता संघ बाजी मारणार याचे भाकित  सुपर कॉम्‍पुटरने केले आहे. ( Super Computer Predicts )

सुपर कॉम्‍पुटरने केलेल्‍या भविष्‍यवाणीनुसार, "यंदाच्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत अर्जेटिना आणि पोर्तुगाल हे संघ फायनलमध्‍ये धडक मारतील. अंतिम सामना हा लिओनेल मेस्सी नेतृत्त्‍व करत असलेल्‍या अर्जेटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नेतृत्त्‍व लाभलेल्‍या पोर्तुगाल संघामध्ये होईल. या महामुकाबल्‍यात अर्जेंटीनाचा संघ हा पोर्तुगालचा पराभव करत विश्‍वविजेता होईल. आपला अखेरचा विश्‍वचषक खेळणारा मेस्‍सी हा अर्जेंटीना संघाला विश्‍वविजेता बनवेल."

Super Computer Predicts : मेस्‍सी करणार रोनाल्‍डोचा पराभव

उपलब्‍ध डाटाच्‍या आधारे सुपर कॉम्‍पुटरने फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेची भविष्‍यवाणी केली आहे. हे भाकित खरे ठरले तर या स्‍पर्धेतील अंतिम सामना संपूर्ण जगासाठी लक्षवेधी ठरणारा असेल. आजपर्यंत पोर्तुगाल संघाने एकदाही विश्‍वचषक पटकावेला नाही. सुपर कॉम्‍पुटरचे भविष्‍यावणी खरी ठरली तर या स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात मेस्‍सी हा रोनाल्‍डोला भारी ठरत आपल्‍या देशाला विश्‍वचक मिळवून देईल.

इंग्‍लंड सेमीफायनलपर्यंत धडक मारणार

सुपर कॉम्‍पुटरने केलेल्‍या भविष्‍यावणीनुसार, यंदाच्‍या फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत इंग्‍लंडचा संघ हा सेमीफायनला पोहचेल. मात्र सेमीफायनलमध्‍ये इंग्‍लंडचा मुकाबला पोर्तुगाल संघाशी होईल. या सामन्‍यात पेनल्‍टी शूटआउटमध्‍ये इंग्‍लंडचा पराभव होईल आणि पोर्तुगालचा संघ अंतिम सामन्‍यात धडक मारेल. २००६ मधील फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेत पोर्तुगाल संघाने क्‍वार्टर फायनल ( उपांत्यपूर्व ) सामन्‍यात पेनल्‍टी शूटआउटमध्‍ये इंग्‍लंडचा पराभव केला होता.

फ्रान्‍सचा पराभव करत अर्जेटिना फायनलमध्‍ये पोहचणार

२०१८ मधील विश्‍वविजेता फ्रान्‍सच्‍या संघ सेमीफायनलमध्‍ये पोहचेल. येथे फ्रान्‍सचा मुकाबला अर्जेटिना संघाशी होईल. या सामन्‍यात अर्जेटिना विजयी होत फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेची अंतिम फेरीत धडक मारेल, असेही भाकित सुपर कॉम्‍पुटरने केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news