Sunny Deol : सनी देओलच्या जुहूतील बंगल्याचा लिलाव; 56 कोटींची थकबाकी

सनी देओल
सनी देओल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सुपरहिट 'गदर-2' चित्रपटाची मोठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे अभिनेता सनी देओलच्या Sunny Deol जुहूतील बंगल्याचा लिलावाची माहिती समोर आली आहे. 56 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने त्याच्या बंगल्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार 25 सप्टेंबरला हा लिलाव होणार आहे.

सनी देओलने Sunny Deol बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. जुहू येथील सनी व्हिला नावाचा बंगला त्यासाठी तारण ठेवण्यात आला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओलने केली नसून 56 कोटींची रक्कम थकविली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 51 कोटी 43 लाख रुपये अशी बोली लावण्यात आली आहे. सनी देओल सध्या त्याच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news