ऊन-पावसाचा रंगला खेळ : शिवाजीनगर, कोंढवा, कात्रज परिसरात हलक्या सरी

ऊन-पावसाचा रंगला खेळ : शिवाजीनगर, कोंढवा, कात्रज परिसरात हलक्या सरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी शहराचे तापमान शहरात देशात सर्वोच्च 39 अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, अवघ्या काही तासांत वातावरणात बदल झाला. शुक्रवार उजाडला तो ढगांच्या गर्दीने. सकाळीच रिमझिम पावसाने वातावरणात बदल झाला. त्यामुळे शुक्रवारी पुणेकरांना उकाड्यातून काही वेळ सुटका मिळाली. शुक्रवारी 1 मार्च रोजी शहरावर दिवसभर आभाळमाया होती. पांढर्‍याशुभ्र ढगांनी सकाळपासूनच गर्दी केली. मुंढवा, हडपसर, नगर रस्ता, वाघोली या भागांत काही मिनिटे हलक्या सरी पडल्या. त्यानंतर कात्रज रस्ता, सहकारनगर, तळजाई परिसर, शिवजीनगर, कर्वे रस्ता, पेठांतील काही भागांत पावसाचे टपोरे थेंब पडले. मात्र, जोरदार पाऊस कुठेही नव्हता. त्यामुळे तापानात 3 ते 4 अंशांनी घट झाली. कमाल तापमानाचा पारा 39 वरून 36 अंशांवर खाली आला.

शिवाजीनगर भागात पाणी साचले…

शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, कोंढवा, कात्रज, सहकारनगर या भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या. शिवाजीनगर भागात सायंकाळी 7 नंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवरील सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे वातावरण आल्हाददायक तयार झाले.

आजही हलक्या सरींचा अंदाज

शहरात शनिवारीही आकाश अंशतः ढगाळ राहील. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 3 मार्चपासून मात्र शहरात पुन्हा कोरडे वातावरण राहील.

शहरात पडलेला पाऊस

(सायंकाळी 8 पर्यंत)

  • शिवाजीनगर : 2.0 मि.मी.
  • पाषाण : 0.8 मि.मी.
  • लोहगाव : नोंद नाही
  • चिंचवड : नोंद नाही
  • लवळे : नोंद नाही
  • मगरपट्टा : नोंद नाही

कमाल व किमान तापमान

  • शिवाजीनगर 36 (20.9)
  • पाषाण 36 (21.3)
  • लोहगाव 35 (22.7)
  • चिंचवड 36 (24.6)
  • लवळे 36 (22.7)
  • मगरपट्टा 35 (22.6)
  • एनडीए 36 (20.4)
  • कोरेगाव पार्क 36 (22.3)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news