Jawan Movie : सुमित अरोरा आणि “जवान”चं काय आहे नातं?

सुमित अरोरा
सुमित अरोरा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रतिभावान लेखक सुमित अरोरा याने नुकताच सोशल मीडियावर त्याचा नवीन प्रोजेक्ट "जवान" बद्दलचा उत्साह शेअर केला आहे. जवान हा त्याच्यासाठी नक्कीच खास आहे, असं तो म्हणतोय चित्रपटाला शुभेच्छा देतो आहे. (Jawan Movie) त्याने या चित्रपटाविषयी आणि या चित्रपटाच्या अनोख्या प्रवासाबद्दल ची खास गोष्ट यातून शेअर केली आहे. सुमित अरोराचा उत्साह स्पष्ट आहे. कारण त्यांनी "जवान" साठी संवाद लिहिले आहेत. त्यांचा अनुभव आणि त्यांच्या असंख्य प्रोजेक्ट मधला वेगळे पणा यातून त्याने मांडला आहे. (Jawan Movie)

सुमित अरोरा यांनी ते ट्विटरवर ट्विट करून सांगितलं-अवघ्या काही तासांत #जवान तुमचे सर्वस्व असेल. मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे पण हा खूप खास चित्रपट आहे. मला फक्त जवानांसाठी संवाद लिहिण्यातच मजा आली नाही तर एक सर्जनशील व्यक्ती म्हणूनही मला खूप अफलातून प्रवास अनुभवयाला मिळाला. आजची रात्र एक खास रात्र होती कारण आम्ही एक टीम म्हणून एकत्र चित्रपट पाहिला. उद्याचा दिवस खास आहे कारण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ! चीफ @Atlee_dir यांचे खास आभार ! सर्जनशील लेखक म्हणून सुमित ची ओळख ही सगळ्यांना माहीत आहे पण जवान हा सुमित साठी एक कमालीचा अनुभव होता हे देखील तितकचं खरं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news