पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट पुष्पा २ मधील पहिले सिंगल 'पुष्पा पुष्पा' गाणे रिलीज झाले. Pushpa या एक्स अकाऊंटवर ही माहिती देण्यात आलीय. शिवाय हे गाणे ६ भाषांमध्ये रिलीज झाले, त्याची लिंक्सदेखील शेअर करण्यात आली आहेत. पहिले सिंगल 'पुष्पा पुष्पा' गाणे तेलुगू, हिंदी, तमिल, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषेत रिलीज झाले. या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले.
जेव्हा 'पुष्पा २: द रूल' ची झलक रिलीज झाली आहे, तेव्हा फॅन्स आणि प्रेक्षक अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटाचे भव्य टीजर पाहून उत्साहित आहेत. पुष्पाच्या रूपात अल्लू अर्जुनचा मास जत्रा लूक व्हायरल झाला, हे पुष्पाच्या फॅन्ससाठी सरप्राईज आहे.
पुष्पा २: द रूल १५ ऑगस्ट, २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. सुकुमार यांचे दिग्दर्शन असून अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मंदाना, फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहेत.