सुकन्या समृद्धी योजना : आता मुलीचे भविष्य करा सुरक्षित; सरकारने व्याजदरातही केली वाढ

सुकन्या समृद्धी योजना : आता मुलीचे भविष्य करा सुरक्षित; सरकारने व्याजदरातही केली वाढ

सरकारने 1 एप्रिलपासून सुकन्या समृद्धी योजनेवर मिळणार्‍या व्याजदरात वाढ केली आहे. आता या योजनेत गुंतवणूक केलेल्यांना दरवर्षी 8 टक्के व्याज मिळणार आहे. आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावयाचे असल्यास तुम्ही सुकन्या समृद्धीचे खाते उघडू शकता. 10 वर्षांच्या आतील मुलींसाठी ही योजना असून, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींचे अशा प्रकारचे खाते सुरू करू शकता. जुळ्या अथवा तीन मुलींचा जन्म झाला असल्यास दोनपेक्षा अधिक खाते उघडू शकता. केवळ 250 रुपयांमध्ये मुलीचे खाते उघडता येते.

कर सवलतीचा फायदा

यंदाच्या आर्थिक वर्षातील समृद्धी योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रक्कम गुंतवली जाऊ शकते. या योजनेत 1.5 लाख रुपये गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा फायदाही मिळतो.

21 वर्षांनतर मॅच्युरिटी

मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर अथवा तिच्या लग्नानंतर खाते मॅच्युअर होईल आणि व्याजासह रक्कम मिळेल. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी या योजनेतील 50 टक्के रक्कम काढता येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news