राज्यात साखर उत्पादन ९५ लाख टनापर्यंतच, हंगाम १०० ते ११४ दिवसांचा

राज्यात साखर उत्पादन ९५ लाख टनापर्यंतच, हंगाम १०० ते ११४ दिवसांचा

कोल्हापूर : गतवर्षी झालेले साखरेचे उत्पादन आणि सध्या उपलब्ध उसाचा विचार करता यावर्षी देशात 25 लाख टन साखर उत्पादन घटेल, असा अंदाज आहे; पण जेवढ्या साखरेची गरज लागते तेवढ्या साखरेचे उत्पादन होऊ शकते, असेही सांगितले जाते. महाराष्ट्रात गतवर्षी 105.30 लाख टन साखर तयार झाली होती. यावर्षी 95 लाख टन उत्पादित होईल. त्यामुळे राज्यात 10 लाख टन साखर उत्पादन घटणार आहे.

देशात 509 कारखाने हंगाम घेत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये मिळून 386 कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत देशात 148.70 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालेले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक यांचा विचार केला तर एकूण साखर उत्पादनाच्या 86.15 टक्के तीन राज्यांमध्ये साखर तयार होत आहे. उर्वरित साखर इतर 10 राज्यांमधूनच तयार होत आहे.

गतवर्षी देशात 330 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यावर्षी गळीत हंगामात देशामध्ये 300.5 लाख टन साखर उत्पादन होईल, असा सरकारने आराखडा तयार केला आहे. यावरून गतवर्षी तुलनेत यावर्षी 25 ते 30 लाख टन साखर कमी होईल, असा अंदाज आहे. इतर जिल्ह्यांतील साखर कारखाने फेब—ुवारीअखेर चालतील, तर कोल्हापुरातील कारखाने मार्चअखेरपर्यंत चालतील. कर्नाटक राज्यामध्ये मात्र या महिनाअखेर कारखाने बंद होतील, अशा प्रकारची माहिती येत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मात्र कारखाने मार्चअखेर किंवा एप्रिल महिन्यापर्यंत कारखाने चालू शकतात. उत्तर प्रदेशात गतवर्षी 105 टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी मात्र तेथे 115 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. यावरून महाराष्ट्रात 10 लाख टन साखर उत्पादन घटणार आहे. ते मात्र उत्तर प्रदेशात उत्पादित होणार्‍या साखरेतून भरून निघेल, असे दिसते. कर्नाटकमध्ये गतवर्षीच्या तुलनेने 17 ते 18 लाख टन साखर कमी उत्पादित होईल. गतवर्षीच्या तुलनेने 24 ते 25 लाख टन साखर देशामध्ये कमी होईल, अशी माहिती उपलब्ध होत आहेत.

हंगाम 100 ते 114 दिवसांचा

महाराष्ट्रामध्ये गतवर्षी 105.30 लाख टन साखर तयार झाली होती. यावर्षी 95 लाख टन साखर उत्पादित होईल. यावर्षी राज्यात 195 कारखाने सुरू झाले आहेत. पाऊस कमी झाल्याने हा गळीत हंगाम 100 ते 114 दिवसांचा होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news