नाशिक : पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा
उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना (Sudhakar Badgujar) तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नोटीस काढल्याने नाशिकचे राजकारण चांगलेच तापले आहे.
उद्धव ठाकरे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. तर बडगुजर यांनी नोटीस घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या प्रकरणी बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन काय तो कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकच्या मुलुख मैदानात भव्य मेळावा झाला आणि ते जाताच पोलिसांकडून नोटीस मिळाल्याने ठाकरे गटाचे बडगुजर आक्रमक झाले आहेत. सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव अजूनही राज्यभर चर्चेत आहे. त्याला ऐन निवडणुकीच्या काळात चांगलाच वादाचे कंगोरे फुटले आहेत.
सलीम कुत्ता प्रकरण
सलीम कुत्ता डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर, व्यंकटेश माेरे यांच्यासह इतर राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते एकमेकांवर करीत आहेत. सलीम कुत्ता यास पॅरोलवर सोडविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते नीतेश राणे यांनी यापूर्वीच केला होता. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केलेली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते दाऊदच्या टोळीतील सदस्यासोबत पार्टी करताना आणि डान्स करताना व्हिडीओ आढळला होता. ज्याचा व्हिडीओ आणि फोटो भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत दाखवले होते.
हेही वाचा :