Sudan Clashes : सुदानमध्ये अन्न पाण्यावाचून परिस्थिती भीषण, लहान मुलांचे कुपोषण, आतापर्यंत 413 जणांचा मृत्यू; WHO ची माहिती

Sudan Clashes
Sudan Clashes
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sudan Clashes : सुदानच्या लष्करी संघर्षात 413 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती WHO जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तर युएनच्या बालसंस्थेने म्हटले आहे की युद्धात लहान मुले मोठी किंमत मोजत आहेत. लष्करी संघर्षात आतापर्यंत किमान 9 बालकांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 50 हून अधिक बालके गंभीर जखमी झाली आहे, असे वृत्त तुर्की न्यूज एजन्सी Anadolu च्या अहवालात दिले आहे.

नुकत्याच झालेल्या डब्ल्यूएचओच्या प्रवक्ता मार्गारेट हॅरिस यांनी यूएनच्या पत्रकार परिषदेत सुदानच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. याचा अहवाल तुर्की न्यूज एजन्सी Anadolu ने दिला आहे. या परिषदेत हॅरिस म्हणाल्या सुदानचे मुख्य लष्कर आणि निम लष्करी दलात (रॅपिड सपोर्ट फोर्स RSF) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 413 लोकांचा मृत्यू झाला असून 3551 लोक जखमी झाले आहेत. तर 11 एप्रिलपासून आरोग्य सुविधांवर 10 हल्ले झाले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुविधांची तिथे वाणवा आहे. (Sudan Clashes)

हॅरिस पुढे म्हणाल्या की, . (Sudan Clashes) सुदानच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते ज्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या 20 जणांनी त्यांचे काम थांबवले आहे. तर आणखी 12 त्यांच्या आरोग्य सुविधा लवकरच थांबवण्याच्या उंबरठ्यावर आहेत. परिणामी ज्यांना काळजीची गरज आहे, उपचारांची गरज होती त्यांच्यावर परिणाम झाला आहे, असे Anadolu अहवालात म्हटले आहे.

त्याच पत्रकार परिषदेत, युनिसेफचे प्रवक्ते जेम्स एल्डर म्हणाले, "नेहमीप्रमाणेच, या लढाईचा मुलांवर विनाशकारी परिणाम होत आहे. हे अगदी स्पष्ट आहे. "आमच्याकडे आता किमान नऊ मुले ठार आणि किमान 50 जखमी झाल्याची माहिती आहे. जोपर्यंत लढाई सुरू आहे तोपर्यंत ही संख्या वाढतच जाईल," असेही ते म्हणाले.

Sudan Clashes : सुदान चकमकीची पार्श्वभूमी

राजधानी खार्तूम आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सुदानी सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यात गेल्या शनिवारी चकमक सुरू झाली. लष्कराने पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांचे संक्रमणकालीन सरकार बरखास्त केले आणि राजकीय शक्तींनी ज्याला "कूप" म्हटले त्यामध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर केली. त्यामुळे ऑक्टोबर 2021 पासून सुदानमध्ये कार्यरत सरकार नाही.

Sudan Clashes : सुदानमध्ये अन्न पाण्यावाचून परिस्थिती भीषण

एल्डर यांनी सूदानमधील लष्करी संघर्षामुळे तिथे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीबाबत माहिती दिली. एल्डर म्हणाले की सुदानमध्ये मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत ज्यांना वीज उपलब्ध नाहीत. अन्न, पाणी, औषध संपल्याने ते घाबरले आहेत. ज्या रुग्णालयांभोवती आग लागली आहे. ती आमच्या गंभीर चिंतांपैकी एक आहे.

ते म्हणाले, सुदानमध्ये आधीच मुलांमध्ये जगातील सर्वात जास्त कुपोषण दर आहे. त्यामुळे आता आमच्यासमोर अशी परिस्थिती आली आहे की सुमारे 50,000 मुलांसाठी गंभीर जीवन वाचवणारा आधार धोक्यात आहे. कारण या लढाईमुळे सुदानमधील कोल्ड चेन धोक्यात आली आहे. ज्यात चार कोटी USD किमतीच्या लस आणि इन्सुलिनचा समावेश आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने आणि इंधनासह जनरेटर पुनर्संचयित करण्याची अक्षमता यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

Sudan Clashes : लहान मुलांचे तीव्र कुपोषण

Anadolu ने दिलेल्या वृत्तानुसार, सुदानमध्ये मुलांनी शाळा आणि काळजी केंद्रांमध्ये आश्रय घेतल्याचा अहवाल युनिसेफला मिळाला आहे. ही मुले आता सभवोतालच्या हिंसाचाराशी लढा देत आहेत. तसेच गोळीबार अधिकाधिक जवळ आल्याने मुलांची रुग्णालये रिकामी करण्यास भाग पडले आहे.

एल्डर म्हणाले की, सुदानमध्ये हिंसाचार वाढण्याआधी, देशातील मुलांच्या मानवतावादी गरजा जास्त होत्या, तीन चतुर्थांश मुले अत्यंत गरिबीत राहण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, 11.5 दशलक्ष मुले आणि समुदाय सदस्यांना आपत्कालीन पाणी आणि स्वच्छता सेवांची आवश्यकता होती. 7 दशलक्ष मुले शाळाबाह्य होती आणि 600,000 हून अधिक मुलांना तीव्र कुपोषणाचा सामना करावा लागला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news