पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणी चंद्रयान मोहिमेवरील देखावा साकारत आहे, तर कोणी चिनाब नदीवर साकारण्यात येणार्या रेल्वे पुलावरील हलता देखावा साकारत आहे… गणेशोत्सवात यंदा वैविध्यपूर्ण विषयांवरील देखाव्यांचा नजराणा पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. मध्यवर्ती पेठांसह उपनगरातील काही भागात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय विषयांवरील जिवंत देखाव्यांची संख्या यंदा जास्त असून, विविध मंदिरे, वाडे, तीर्थस्थळे आणि प्रेक्षणीय स्थळांच्या भव्य प्रतिकृतीही साकारण्यात येत आहेत. 'तृतीयपंथीय समाजाचा एक घटक'पासून ते 'मोबाईलचे दुष्परिणाम' यापर्यंत विविध सामाजिक विषयांवरील देखावेही पुणेकरांना पाहता येणार आहेत.