भयंकर… चौथीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांनी ‘कंपास’ने केला १०८ वेळा हल्‍ला!

Crime
Crime

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशमधील इंदूर येथील एका खाजगी शाळेत भयंकर प्रकार उजेडात आला आहे. या शाळेत चौथीच्‍या एका विद्यार्थ्यावर त्याच्या तीन वर्गमित्रांनी कंपासने तब्‍बल १०८ वेळा हल्ला केल्‍याचे उघड झाले आहे. या घटनेची गंभीर दखल बाल कल्‍याण समितीने (सीडब्‍ल्‍यूसी) घेतली असून पोलिसांकडून तपास अहवालही मागविला असल्‍याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.

मुलांच्‍या हिंसक वर्तनाचे कारण शोधण्यासाठी अहवाल मागविला

या घटनेबाबत माहिती देताना बाल कल्‍याण समितीच्‍या पल्‍लवी पोरवाल यांनी सांगितले की, एरोड्रोम पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. चौथीच्‍या विद्यार्थ्यांमध्‍ये भांडण झाले. यानंतर तीन वर्गमित्रांनी कंपासने विद्यार्थ्यावर 108 वेळा हल्ला केला होता. हे प्रकरण धक्कादायक आहे. एवढ्या लहान वयातील मुलांच्या हिंसक वर्तनाचे कारण शोधण्यासाठी आम्ही पोलिसांकडून तपास अहवाल मागवला आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. student attacked 108 times with compass by classmates

बाल कल्‍याण समिती मुलांसह कुटुंबियांचेही समुपदेशन करणार

या घटनेत सहभागी असणारी मुले आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांचे समुपदेशन करणार आहे. संबंधित मुले हिंसक दृश्ये असलेले व्हिडिओ गेम खेळत होते का, हे तपासावे लागेल, असेही पोरवाल यांनी म्‍हटले आहे.

सीसीटीव्‍ही फूटेज देण्‍यास शाळेचा नकार

या घटनेतील पीडित मुलाच्‍या वडिलांनी माहिती दिली की, २४ नोव्‍हेंबर रोजी दुपारी दोनच्‍या सुमारास शाळेत झालेल्‍या
हल्‍ल्‍यानंतर मुलगा प्रचंड घाबरला होता. वर्गमित्रांनी त्याच्‍यावर इतका भीषण हल्‍ला कसा केला हेच कळत नाही. शाळा व्यवस्थापन वर्गातील सीसीटीव्ही फुटेज देण्‍यास नकार दिला आहे. या घटनेबाबत एअरोड्रोम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे, त्यांनी सांगितले.या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्‍त विवेक सिंह चौहान यांनी सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या घटनेत सहभागी सर्व मुले दहा वर्षांपेक्षा कमी वयाची असून, कायदेशीर तरतुदींनुसार योग्य ती पावले उचलली जात आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news