Ragging : रॅगिंग आढळल्यास कठोर कारवाई

Ragging : रॅगिंग आढळल्यास कठोर कारवाई

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विद्यार्थ्यांवरील रॅगिंगचे प्रकार न थांबल्यास महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठ नियामक आयोगाने (यूजीसी) दिला आहे. यूजीसीने रिमायंडर (स्मरणपत्र) जारी केला असून रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीचे कडकपणे पालन करण्याचे निर्देशही यूजीसीने दिले आहेत.

रॅगिंगसंदर्भातील यूजीसीने नव्याने स्मरणपत्र जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, रॅगिंग हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी यूजीसीने तयार केलेल्या रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीची अंमलबजावणी करावी. रॅगिंगसारख्या घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी कॅम्पसमध्ये रॅगिंग प्रतिबंधक स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी. नियमावलीचे उल्लंघन झाल्यास शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा सज्जड दमही यूजीसीने दिला आहे.

* विविध माध्यमांतून जागृती करावी
* रॅगिंग प्रतिबंधक समिती, कृती दल स्थापन करा
* कार्यशाळा, चर्चासत्राद्वारे समुपदेशन करावे
* विद्यार्थ्यांच्या तक्रारींची त्वरित दखल घ्यावी
* महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा

* होस्टेल, कॅन्टीन, प्रसाधनगृह, रिक्रिएशनल कक्ष, बस स्टँड आदी ठिकाणी नियमित तपासणी करावी. ग्रंथालय, कॅन्टीनसह नोटीस बोर्डवर सूचना फलक लावावे. संकेतस्थळावर रॅगिंगबाबतचे अपडेट प्रसारित करावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news