धक्कादायक ! नगरमधील सहलीच्या बसवर कोल्हापुरात दगडफेक

धक्कादायक ! नगरमधील सहलीच्या बसवर कोल्हापुरात दगडफेक

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगरहून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्याच्या एस. टी.बसवर कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात दगडफेक झाल्याची घटना बुधवारी (दि.31) सायंकाळी घडली. दगडफेकीत बसच्या काचा फुटून नुकसान झाले. या घटनेत विद्यार्थी व शिक्षक सुखरुप आहेत. नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप विद्यालयाचे 43 विद्यार्थी एस.टी. बसने बुधवारी (दि.31) पहाटे सहलीला रवाना झाले. सायंकाळी सहा वाजता ते कोल्हापूरला पोहोचले. भाविक व पर्यटकांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था दसरा चौकात करण्यात आली आहे. त्याठिकाणी ही बस जात होती. बसमध्ये विद्यार्थी घोषणा देत होते. त्यावेळी अचानक जमावाने बसवर दगडफेक केली. त्यामुळे सर्वजण गोंधळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी आला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. दगडफेकीत बस च्या काचा फुटल्या. मात्र, सर्व विद्यार्थी सुखरूप असून सहल नियोजनाप्रमाणे सुरू झाली, असे मुख्याध्यापक दीपक काकडे यांनी सांगितले.
घोषणाबाजी ऐकून झाली दगडफेक कोल्हापूरमध्ये बुधवारी (दि.31) अतिक्रमणावरुन गोंधळ सुरू होता. दरम्यान दसरा चौकातील मैदानावरील वाहनतळ येथे सहलीसाठी आलेल्या गाड्या थांबवल्या जात असताना नगरच्या बसमधील विद्यार्थी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत होते. या घोषणा ऐकून समाजकंटकांनीे बसवर दगडफेक केल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news