पुणे : सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक; एक प्रवासी जखमी

पुणे : सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक; एक प्रवासी जखमी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना कर्जत जवळ शेलू वांगली परिसरात घडली आहे. यात एका प्रवाशाच्या डोक्याला दगड लागून तो जखमी झाला आहे. त्याच्यावर रेल्वे स्थानकावर प्रथम उपचार करण्यात आले असून या घटनेबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात रेल्वेचे अधिकारी यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले.

रेल्वे धावत असताना ठीक ठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या यापूर्वी अनेकदा घटना घडल्या आहेत. यात अनेक प्रवाशांना जखमी व्हावे लागले आहे. मात्र या घटना अद्याप पर्यंत थांबण्याचे नाव घेत नाहीत. यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही त्यामुळे प्रवासी जखमी होत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news