अहमदनगरच्या शेवगावमध्ये दगडफेक; अनेक वाहनांचं मोठं नुकसान, उशिरापर्यंत तणाव

अहमदनगरच्या शेवगावमध्ये दगडफेक; अनेक वाहनांचं मोठं नुकसान, उशिरापर्यंत तणाव

Published on

शेवगाव तालुका(नगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव शहरात सुरू असलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आला आहे. या दगडफेकीत काही तरुण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेवगाव शहरातील शिवाजी चौकात रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाल्याने एकाच धावपळ उडाली. दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाल्याने तणाव वाढला. या दगडफेकीत अनेक दुचाकीचे नुकसान झाले आहे. दगडफेकीने अनेक दुकानांच्या काचा फुटल्याचे सांगण्यात आले. मिरवणुकीला गालबोट लागल्याचे समजताच पोलिसांची कुमक शेवगावकडे रवाना झाली आहे. रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news