Stock Market Updates | शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, Jio Financial ची जोरदार सलामी

Stock Market Updates | शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, Jio Financial ची जोरदार सलामी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांच्या जोरावर शेअर बाजाराने आज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीत सुरुवात केली. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेने मंदीचे संकेत दिल्यानंतर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीची चिंता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०२ अंकांनी वाढून ६५,३७० वर पोहोचला. तर निफ्टी ७७ अंकांच्या वाढीसह १९,४२० वर व्यवहार करत आहे. सकाळच्या व्यवहारात सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर जियो फायनान्सियल सर्व्हिसेसचा शेअर टॉप गेनर आहे. हा शेअर ५ टक्के वाढून २३२ रुपयांवर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, टाटा स्टील, एम अँड एम, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. केवळ पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली आहे.

फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोच्या शेअर्सने (Shares of Zomato) बुधवारी प्री-ओपनिंग ट्रेडमध्ये संभाव्य ब्लॉक डीलवर ५ टक्के वाढून ९९.६० रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावर झेप घेतली.

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी रियल्टी १ टक्क्यानी वाढला आहे. निफ्टी ऑटो, बँकिंग, फायनान्सियल, एफएमसीजी, आयटी, फार्मा, मीडिया आणि मेटल या क्षेत्रातील शेअर्समध्येही वाढ दिसून येत आहे.

अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल वाढून बंद झाले. याचा मागोवा घेत आशियाई बाजारांनाही तेजीत सुरुवात केली आहे. (Stock Market Updates)

स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसारस, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ६१.५ कोटी रुपयांचे शेअर्स, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ३०५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news