Stock Market Updates | शेअर बाजाराची सावध सुरुवात, JFS तेजीत, अदानी शेअर्सवर दबाव

Stock Market Updates | शेअर बाजाराची सावध सुरुवात, JFS तेजीत, अदानी शेअर्सवर दबाव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शेअर बाजाराने किरकोळ वाढीसह सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) आज १०० हून अधिक अंकांनी वाढून ६५,२०८ वर गेला. तर निफ्टी (Nifty) १९,३५० वर होता. (Stock Market Updates) त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले.

सेन्सेक्सवर जियो फायनान्सियल शेअरची आघाडी कायम आहे. हा शेअर ५ टक्के वाढून २४४ रुपयांवर व्यवहार करत आहे. मारुती, टाटा स्टील, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन हे शेअर्स वाढले आहेत. तर भारती एअरटेल, सन फार्मा, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत.

तर निफ्टीवर हिंदोल्को इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजीस, टाटा मोटर्स, डिव्हिस लॅब्स आणि मारुती हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायजेस, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले आहेत.
अदानी समुहातील सर्व १० शेअर्स लाल चिन्हात खुले जाले आहेत. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अदानी टोटल गॅस हे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. (Stock Market Updates)

अमेरिकेतील शेअर बाजारात काल सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारातील निर्देशांकही वधारले आहेत.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news