Stock Market Opening : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मोठ्या व्याजदरवाढीचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परिणामी भारतीय शेअर बाजाराने आज (दि.८) घसरणीने सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंकांनी खाली आला होता. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स १२७ अंकांनी घसरून ६० हजारांवर होता. तर निफ्टी १७,६८७ वर होता. आज सर्वच क्षेत्रात विक्रीचा जोर दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, टायटन आणि कोटक बँक हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स १ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. इंडसइंड बँक, विप्रो, एशियन पेंट्स, टीसीएस आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्सदेखील घसरले आहेत. तर मारुती, एल अँड टी आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.
क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी मेटल १.४७ टक्के घसरला, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी रियल्टी हेदेखील घसरले आहेत. (Stock Market Opening)
हे ही वाचा :