Stock Market Opening Bell : शेअर बाजारात ‘घसरणी’ला ब्रेक, सेन्सेक्स ६४७००च्‍या समीप

Stock Market Opening Bell : शेअर बाजारात ‘घसरणी’ला ब्रेक, सेन्सेक्स ६४७००च्‍या समीप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: जागतिक बाजारापेठेतील सदृढ स्‍थितीचे सकारात्‍मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसत आहेत  व्‍यवहाराच्‍या प्रारंभी प्रमुख निर्देशांकांनी सकारात्‍मक सुरु केली. त्‍यामुळे केली चार दिवस घसरणीला ब्रेक लागला. बीएसई सेन्सेक्स 160 अंकांनी वधारत 64,700 च्‍या समीप पोहचला तर निफ्टीनेही 19,300 ची पातळी ओलांडली आहे.

आज बाजारात प्रारंभीच्‍या व्‍यवहारात धातू आणि बँकिंग क्षेत्राच्‍या शेअर्सला पाठिंबा मिळत आहे. हिंदाल्को आणि टाटा स्टील हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स आहेत. याआधी सोमवारी भारतीय बाजारात सलग चौथ्या दिवशी बाजाराने नकारात्‍मकता अनुभवली होती. BSE सेन्सेक्स 825 अंकांनी घसरून 64,571 वर बंद झाला होता.

आज बाजाराची सुरुवात तेजीने झाली आहे. सेन्सेक्स 145.05 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 64,712.90 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 41.00 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 19322.75 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

आशियाई बाजारात संमिश्र व्‍यवहार

आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवसाय पहायला मिळत आहे. GIFT NIFTY 11.00 अंकांनी घसरत आहे. त्याच वेळी, निक्केई 1.29 टक्क्यांच्या वाढीसह 31,466.92 च्या आसपास दिसत आहे. तैवानचा बाजार 0.88 टक्क्यांनी वाढून 16,445.20 वर व्यापार करत आहे. तर हँगसेंग 2.52 टक्क्यांच्या वाढीसह 17,420.45 च्या पातळीवर दिसत आहे. त्याचवेळी कोस्पीमध्ये 0.45 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. त्याच वेळी, शांघाय कंपोझिट 2,985.70 च्या पातळीवर 0.80 टक्क्यांनी वाढ दर्शवत आहे.

कच्‍च्‍या तेलाच्‍या किमती सलग चौथ्‍या दिवशी घसरल्‍या

कच्च्या तेलाच्या किमती सलग चौथ्या दिवशी घसरल्या आहेत. यासह, ब्रेंट क्रूडची किंमत आता प्रति बॅरल 88 डॉलरवर पोहोचली आहे. WTI ची किंमत $84 च्या खाली घसरली. कच्च्या तेलाच्या किमतीतील ही घसरण जर्मनी आणि युरोपमधील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे ऊर्जेची मागणी कमी होण्याच्या भीती व्‍यक्‍त होत आहे.

सलग चार दिवस बाजाराने अनुभवली होती घसरण

23 ऑक्टोबर रोजी बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 825.74 अंकांच्या किंवा 1.26 टक्क्यांच्या घसरणीसह 64571.88 वर बंद झाला आणि निफ्टी 260.90 अंकांच्या किंवा 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह 19281.80 वर बंद झाला होता. सुमारे 497 शेअर्स वाढले होते. त्याच वेळी, 2893 समभाग घसरले आहेत. तर 119 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नव्‍हता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news