Stock Market Closing | अमेरिकेतील कर्ज मर्यादेचे शेअर बाजारावर सावट, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंगमध्ये काय घडलं?

Stock Market Closing | अमेरिकेतील कर्ज मर्यादेचे शेअर बाजारावर सावट, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंगमध्ये काय घडलं?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात आज गुरुवारी चढ- उतार दिसून आला. अमेरिका कर्ज मर्यादा वाटाघाटीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी घसरले होते. पण दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी तोटा पुसून टाकला आणि त्यांनी बाजार बंद होण्याच्या आधी काहीवेळ तेजीत व्यवहार केला. सेन्सेक्स आज ९८ अंकांनी वाढून ६१,८७२ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३५ अंकांच्या वाढीसह १८,३२१ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट झाले होते. त्यानंतर त्यात चढ-उतार झाला. आजच्या ट्रेडिंगदरम्यान क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी PSU Bank ०.५९ टक्के खाली आला. निफ्टी मेटलही घसरला. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस आणि निफ्टी ऑटो देखील घसरले. अमेरिकेची फेडरल रिझर्व्हची अनिश्चित भूमिका आणि अमेरिका कर्ज मर्यादेबद्दल चालू असलेल्या चर्चेमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण तयार झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Sensex वरील टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर भारती एअरटेल, आयटीसी, कोटक महिंद्रा, लार्सेन, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड हे टॉप गेनर्स होते. तर विप्रो, टाटा मोटर्स, एचडीएफसी, सन फार्मा, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.

LIC चे शेअर्स तेजीत

२०२३ आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत LIC चा नफा अनेक पटींनी वाढल्याने LIC चे शेअर्स सुमारे ३ टक्के वाढले. एलआयसीचा चौथ्या तिमाहीतील नफा १३,४२८ कोटींवर गेला आहे. दरम्यान, Nykaa चे शेअर्स चौथ्या तिमाहीतील कमाईनंतर १ टक्क्यांहून अधिक वाढले.

Zomato ही वधारला

Zomato shares चा आज पाच महिन्यांच्या उच्चांकावर म्हणजेच ६८.१० रुपयांवर पोहोचला. गेल्या दोन महिन्यांत झोमॅटो या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्स किमतीत ३६ टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे.

'हा' शेअर्स घसरला

टेक्स्टाईल फॅब्रिक उत्पादक ट्रायडंटचा (Trident Share Price) शेअर बीएसईवर गुरुवारच्या व्यवहारात सुमारे ६ टक्के घसरून ३२.६० रुपयांवर आला. ट्रायडंटने चौथ्या तिमाहीत १२९.७ कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील १८१ कोटींच्या तुलनेत यंदाचा नफा २८.४ टक्क्यांनी कमी आहे. (Stock Market Closing)

Stock Market Closing : जागतिक बाजारातील स्थिती काय?

व्हाईट हाऊस आणि रिपब्लिकन प्रतिनिधी यांच्यामधील अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाढवण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील मुख्य निर्देशांक बुधवारी खाली आले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज ०.७७ टक्के घसरला. तर S&P 500 ०.७३ टक्के कमी झाला आणि Nasdaq Composite निर्देशांक ०.६१ टक्के घसरला. अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाटाघाटीचे आशियाई बाजारातही पडसाद दिसून आले आहेत. आज आशियाई बाजारातील निर्देशांक घसरले. चीनचा शांघाय कंपोझिट (Shanghai Composite) ०.६६ टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक (Hang Seng index) १.९६ टक्के घसरला. दरम्यान, जपानचा निक्केई (Nikkei 225) ११८ अंकांनी वाढून ३०,८०१ वर पोहोचला. तर टॉपिक्स निर्देशांकामध्ये (Topix index) किरकोळ घसरण दिसून आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news