Steve Smith : 1 चेंडूत 16 धावा! ‘BBL’मध्ये स्टीव्ह स्मिथचा झंझावात (Video)

Steve Smith : 1 चेंडूत 16 धावा! ‘BBL’मध्ये स्टीव्ह स्मिथचा झंझावात (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (steve smith) टी-20 क्रिकेटमध्ये धुमाकुळ घातला आहे. बिग बॅश लीगमध्ये (BBL) सलग दोन शतके झळकावल्यानंतरही त्याची झंझावाती फलंदाजी सुरूच आहे. होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या सामन्यात स्मिथने आक्रमक खेळी करून 22 चेंडूत अर्धशतक फटकावले. या खेळीदरम्यान, त्याने चक्क एका चेंडूवर 16 धावा वसूल करण्याचा पराक्रम केला. त्या सामन्यात स्मिथने 33 चेंडूत 66 धावा तडकावल्या.

बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) सोमवारी सिडनी सिक्सर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात सामना झाला. सिडनी सिक्सर्सच्या डावात जोएल पॅरिस (Joel Paris) दुसरे षटक टाकत होता. या षटकात जोश फिलिप्स आणि स्टीव्ह स्मिथ (steve smith) फलंदाजी करत होते. पॅरिसने या षटकाचा तिसरा चेंडू नो-बॉल टाकला होता, ज्यावर स्मिथने षटकार ठोकला. त्यामुळे आपसूकच 7 धावा मिळाल्या. नो बॉलमुळे फ्री हिट मिळाला, पण पुढच्याच चेंडूवर पॅरिसने वाईड बॉल टाकला. यष्टिरक्षकही हा चेंडू पकडू शकला नाही आणि सिडनी सिक्सर्सला 5 धावा मिळाल्या. वाईड बॉलमुळे फ्री हिट कायम राहिला आणि पुढच्याच चेंडूवर स्मिथने चौकार मारला. अशाप्रकारे सिडनी सिक्सर्सने पॅरिसच्या एका चेंडूवर 16 धावांची वसूली केली. एकंदरीत पॅरीसच्या त्या षटकात एकूण 21 धावा मिळाल्या. यातील 10 धावा स्मिथच्या खात्यात जमा झाल्या.

स्टीव्ह स्मिथने (steve smith) आपल्या 66 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार ठोकले, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 होता. यासह स्मिथ बिग बॅश लीगच्या चालू हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. स्मिथने अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध पहिले शतक झळकावले. त्या खेळीदरम्यान त्याने 56 चेंडूत 101 धावा केल्या. ज्यामध्ये 5 चौकार आणि 7 षटकार होते. त्यानंतर सलग दुस-या सामन्यात त्याच्या बॅटमधून सिडनी थंडर्सविरुद्ध दुसरे शतक झळकले. यादरम्यान त्याने 66 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 125 धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राइक रेट 189.39 होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by KFC Big Bash League (@bbl)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news