Steve Jobs: तब्बल १.७ कोटी रूपयांना विकले Apple चे संस्थापक स्टिव्ह जॉब यांचे सँडेल

Steve Jobs: तब्बल १.७ कोटी रूपयांना विकले Apple चे संस्थापक स्टिव्ह जॉब यांचे सँडेल

पुढारी ऑनलाईन : टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नामांकित कंपनी Apple चे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचे सँडल हे 218,750 डॉलरला (अंदाजे ₹1.7 कोटी) विकले गेले असल्याची माहिती ज्युलियन ऑक्शन्सच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी वापरलेले हे सँडल ४२ वर्षापूर्वीचे आहे. स्टिव्ह जॉब वपरत असलेले ब्राऊन सूड लेदर बर्केनस्टॉक अ‌ॅरिझोना सँडल्स' हे 'ज्युलियन ऑक्शन्स'च्या अधिकृत वेबसाईटवर लिलावासाठी ठेवण्यात आली होती. यावरूनच स्टिव्ह जॉब यांचे सँडेल १.७ कोटी रूपयांना विकले गेले आहे.

या काळात वापरत होते ही सँडेल

स्टिव्ह जॉब्सच्या ज्या सँडेलची तब्बल ७ कोटींना विक्री झाली ती सँडेल स्टिव्ह हे सत्तरच्या दशकात वापरत होते. ज्युलियन ऑक्शन्सने दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये मरण पावलेल्या जॉब्स यांनी 1970 ते 1980 च्या दशकात हे सँडल वापरले होते. यानंतर बर्कनस्टॉक सँडलची ही जोडी स्टीव्ह जॉब्सचे हाउस मॅनेजर मार्क शेफ यांना दिली असल्याचेही या संकेतस्थळावर सागण्यात आले आहे.

खरेदी करणाऱ्याचे नाव गुलदस्त्यात

जॉब्स हे त्यांच्या टापटीपणा आणि पोशाखामुळे जगप्रसिद्ध होते. त्याचप्रकारे आत्ता व्रिकी झालेले त्यांचे सँडेल देखील अगदी टापटीप वापरलेले आहे. या सँडेलवर जॉब्सच्या पायांचा ठसा देखील दिसत आहे. ज्युलियन्सने जॉब्स यांचे सँडेल कितीला विकली गेली सांगितले असले तरी खरेदी करणाऱ्याचे नाव मात्र जाहिर केलेले नाही. स्टिव्ह जॉबचे हे ऐतिहासिक सँडेल खरेदी करणाऱ्याचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news