राज्य क्रीडा दिनाला सहा वर्षांनी मिळाला’न्याय’

राज्य क्रीडा दिनाला सहा वर्षांनी मिळाला’न्याय’
पुणे :  स्व. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनाच्या दिवशी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी प्रथम मॉर्डन पॅन्टॅथलॅान असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली होती. या मागणीची प्रथम दखल दै. 'पुढारी'च्या वतीने घेत सातत्याने त्यावर प्रकाश टाकला. अखेर सहा वर्षांनंतर या राज्य क्रीडा दिनाला न्याय मिळाला असून, यापुढे दि. 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 15 जानेवारी हा ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा होणार अशी घोषणा केली. वास्तविक पाहता 2017-18 साली मॉर्डन पॅन्टॅथलॅान असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या उपाध्यक्ष या नात्याने अमित गायकवाड यांनी स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरा करावा, असा प्रस्ताव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला.
या प्रस्तावावर असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार आणि सचिव नामदेव शिरगावकर यांनी पदाधिकार्‍यांसह चर्चा करीत प्रस्ताव मान्य केला.
हा प्रस्ताव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने महाराष्ट्र शासनाला सादर ही केला. सर्वप्रथम 2017-18 ला ज्यावेळी हा ठराव एमओएच्या बैठकीत मान्य झाला. परंतु, शासनस्तरावर त्याची मान्यता रखडली. 2022 साली ह्या ठरावानुसार नामदेव शिरगावकर आणि अमित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून राज्यभर साजरा केला. या सर्व प्रकरणांचे दै. 'पुढारी'ने वारंवार दखल घेत राज्य क्रीडा दिन साजरा करण्याबाबतची भूमिका सातत्याने मांडली. अखेर सहा वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांनी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याबाबत घोषणा केली.
हेही वाचा  :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news