पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणाचं टार्गेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई येथे राज्य सरकारच्या युवा कौशल्य विभागाच्या वतीने 'छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा'चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आज (दि.१८) उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तरूणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार तरूणांना नोकऱ्या सरकारने दिल्या. आणखी ३ लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट सरकारच आहे. आमचे सरकार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी हजारो करोड रूपये खर्च करते. तरूणांना स्वयंरोजगार मिळावा हेच सरकारचे उद्दीष्ट आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तरूणांना १५ लाख रूपयांपर्यंतचं कर्ज विना व्याज दिल जातं. त्याला कोणतही तारण घेतलं जात नाही, त्याच व्याज सरकार भरते. यामधुन छोटे व्यवसाय तरूण करू शकतात. युवकांना भविष्यातील विविध कौशल्य असलेले अभ्यासक्रम माहित व्हावेत, यासाठी अशा शिबीरांच आयोजन महत्वाचं आहे. देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी युवाशक्तीचा योग्य वापर व्हायाला पाहिेजे. त्यांना दिशा दाखविण्याचं काम आपण केलं पाहिजे. यासाठी या शिबिराच आयोजन केले आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपला देश महान बनवू, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रंशसा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी युवाशक्तीची ताकद ओळखली आहे. जी २० चं अध्यक्षपद भारताला मिळणं हे अभिमानास्पद आहे. मोदींनी युंवांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. तरूणांच्या हाताला काम मिळणं गरजेच आहे. यासाठी सरकारने एकाचवेळी ७५ हजार नोकऱ्या तरूणांना दिल्या. पंतप्रधानांच्या नेतृत्वात जगभरात भारत पुढे जातोय, अशा शब्दात शिंदे यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.
हेही वाचा :