ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर : कोल्हापूर जिल्ह्यातील 66 सदस्य, सहा थेट सरपंचपदासाठी 18 मे रोजी मतदान

ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर : कोल्हापूर जिल्ह्यातील 66 सदस्य, सहा थेट सरपंचपदासाठी 18 मे रोजी मतदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य तसेच थेट सरपंचपदासाठी राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी पोटनिवडणूक जाहीर केली. जिल्ह्यातील 60 ग्रामपंचायतींतील सदस्यपदाच्या रिक्त 66 तर थेट सरपंचपदाच्या 6 अशा एकूण 72 जागांसाठी 18 मे रोजी मतदान होणार आहे.या पोटनिवडणुकीसाठी 25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत शनिवार, रविवार आणि 1 मे रोजीची महाराष्ट्र दिनाची सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 3 मे रोजी छाननी होईल. 8 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. 18 मे रोजी सकाळी साडेसात ते सांयकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

करवीरमधील सहा ग्रामपंचायतींतील सात जागा, कागलमधील एक, पन्हाळ्यातील आठ ग्रामपंचायतील सात सदस्यांच्या तर दोन थेट सरपंच अशा नऊ जागांसाठी पोटनिवडणूक होईल. शाहूवाडीतील 5 ग्रामंपचायतींच्या सदस्यांच्या पाच आणि थेट सरपंचांची एक अशा एकूण सहा, राधानगरीतील पाच ग्रामपंचायतीच्या पाच, हातकणंगले व गगनबावड्यातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायीच्या तीन, शिरोळच्या आठ ग्रामपंचायतीच्या आठ जागा, आजर्‍यातील दोन ग्रामपंचायतीच्या दोन जागा, गडहिंग्लजमधील सहा ग्रामपंचायतींतील सात रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. भुदरगडमधील तीन ग्रामपंचायतील दोन सदस्यांच्या तर एका सरपंच पदासाठी तर जिल्ह्यात सर्वाधिक दहा ग्रामपंचायतींच्या 16 सदस्यांसाठी तर दोन सरपंच अशा एकूण 18 जागेसाठी चंदगड तालुक्यात निवडणूक होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news