पुढारी ऑनलाईन : महिलांना पर्यटन व्यवसायात संधी आणि अधिक वाव देण्यासाठी राज्यात महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार असल्याचा निर्णय आज (दि.३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबराेबरच अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक (State Cabinet meeting) आज ( दि. ३०) पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.