नवीन वर्षाची सुरुवात करा पुण्यातील ‘या’ खास स्थळांना भेटी देऊन

नवीन वर्षाची सुरुवात करा पुण्यातील ‘या’ खास स्थळांना भेटी देऊन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बघता बघता सरत्या वर्षाला निरोप देण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. येत्या वर्षात अनेकांनी नवे नवे संकल्प केले असतील. नव्या वर्षाचं स्वागत करण्याची प्रत्येकाची पद्धत खूपच वेगळी असते. काहीजण ती रात्रभर जागून करतील तर काहीजण सकाळी लवकर उठून वर्षाचा पहिला सूर्योदय पाहतील. पण आम्ही मात्र काही हटके टिप्स देत आहोत. ज्यामुळे तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम खास होऊ शकते.

दगडूशेठ गणपती मंदिर : नव्या गोष्टीची सुरुवात करताना गणपती बाप्पाचे आशिर्वाद आपण सगळेच घेत असतो. प्रत्येक पुणेकराच्या मनातील खास जागा व्यापणारा बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपती. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या मंदिरात जायला हरकत नाही.

कसबा गणपती मंदिर : पुणेकरांसाठी महत्त्वाचा आणि पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती मंदिर. वर्षाची सुरुवात या बाप्पाच्या दर्शनाने करायला हरकत नाही.

चतु: शृंगी मंदिर : ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेलं हे मंदिर सकाळी लवकर भेट देण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. आसपास असलेली वनराई मन प्रसन्न करते.

पर्वती मंदिर : सकाळी थोडी एक्सरसाईज आणि नवा अनुभव एकत्र घ्यायचा असेल तर या मंदिराला भेट जरूर द्या. कारण या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला शंभराहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतील.

ओंकारेश्वर मंदिर : मन शांती आणि अध्यात्म हे दोन्ही तुम्हाला या मंदिरात साधता येईल. पुण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक हे मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर आहे.

सारसबाग मंदिर : पुण्यातील प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. यांच्या आसपास असलेल्या बागेला भेट देण्यासाठी आणि गणपतीच्या सुरेख मूर्तीचं दर्शन घेऊन वर्षाची झकास सुरवात करू शकता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news