Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू
Published on
Updated on

पुणे; पुढारी ऑनलाईन : पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा चेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. गाडी फलाटावर आल्यावर प्रचंड गर्दी होती. डब्यात चढताना एकजण खाली पडला गर्दी त्याला तुडवत पुढे गेल्याने त्या प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला.(Pune Railway Station)

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अशा स्थितीत गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री पुणे दानापूर एक्सप्रेसला प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीतून गाडीमध्ये चढत असताना प्रवासी खाली पडला आणि इतर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत तो गंभीर जखमी झाला, त्याला रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी तात्काळ उपचारासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपविला. मात्र यावेळी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले (Pune Railway Station)

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news