ST Bus stand : एसटीची २२७ बसस्थानके कात टाकणार; स्थानकांची पुनर्बांधणी, प्रवासी सुविधांत होणार वाढ

ST Bus stand : एसटीची २२७ बसस्थानके कात टाकणार; स्थानकांची पुनर्बांधणी, प्रवासी सुविधांत होणार वाढ
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, ST Bus stand : प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी आणि बस स्थानक चकाचक करुन चांगल्या सोयी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून निधी अभावी रखडलेल्या एसटी बस स्थानकांच्या आधुनिकिकरण आणि पुर्नबांधणी प्रकल्पाला पुन्हा गती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील २२७ बस स्थानकांचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. हा पुर्नविका करताना प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ९८५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

ST Bus stand : राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांची एसटी प्रमुख प्रवासाचे साधन आहे. सध्या एसटीतून सुमारे ५० लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. राज्यात एसटीचे एकूण ५८० बस स्थानके आहेत. परंतु यापैकी अनेक बस स्थानकांची ST Bus stand अवस्था दयनीय आहे. बस स्थानकांमध्ये स्वच्छता नाही, रंग उडालेला आहे. प्रवाशांना बसण्यासाठी चांगले बाकडे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छ शौचालये नाहीत. त्यामुळे अशा बस स्थानकातून ST Bus stand प्रवास करताना नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे एसटी महामंडळाने बस स्थानकांचे स्वरुप बदलण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०१५ ते २०२२ या कालावधीत १७९ बस स्थानकांचे आधुनिकीकरण, पुनर्बांधणी, नुतनीकरण करण्याचे काम सुरु केले. यापैकी ४९ बस स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे तर उरलेल्या बसस्थानकांचे काम आजही पूर्ण झालेले नाही.

मार्च २०२० पासून कोरोनामुळे राज्यातील एसटीची वाहतूक बंद झाली. त्यानंतर संप झाला. सरकारकडून निधी पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे बस स्थानकांच्या ST Bus stand पुर्नविकासाचा प्रकल्प रखडला आणि प्रकल्प खर्च देखील वाढला.

महामंडळाने काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढली. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी ४५० कोटी रुपये मंजुर केले. जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाले. नवीन राज्य सरकारने ९७ बस स्थानकांचा पुर्नविकास करण्याचा निर्णय घेतला. आधीचे अपुर्ण १३० आणि नवीन ९७ अशा एकुण २२७ बसस्थानकांचा आता विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ९८५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. येत्या अर्थसंकल्पात याला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ST Bus stand : मुलभूत सुविधांना प्राधान्य

आवश्यक असेल तेथे बसस्थानकांची पुनर्बांधणी, प्रवाशांकरिता चांगली आसन व्यवस्था, स्वच्छ प्रसाधनगृहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय यास प्राधान्य असणार आहे. सदर बसस्थानकांमध्ये शहापूर (ठाणे), महाड, पोलादपूर, (रायगड) चिपळूण, रत्नागिरी, लांजा (रत्नागिरी), त्र्यंबकेश्वर, मेळा (नाशिक) यासह अन्य बस स्थानकांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news