पुढारी ऑनलाईन: मोदी सरकारकडून देशातील युवकांसाठी नोकर भरतीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून देशातील १२ वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC Notification 2022) साडेचार हजार पदांची अधिसूचना जारी केली आहे.
SSC CHSL 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही सुद्धा १२ वी पास असाल तर, SSC ची वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज (SSC Notification 2022) करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी २०२३ आहे.
SSC CHSL 2023 च्या टियर-१ ची परीक्षा ऑनलाइन असेल. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च 2023 मध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. टियर-१ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी टियर २ परीक्षा देता येणार आहे. त्यांना याबाबत सांगितले जाईल.