SRK Jawan Movie : रविवारी ‘जवान’चा धुमाकूळ, कमाईची गती कायम

jawan movie
jawan movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर जवान बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ॲटलीच्या दिग्दर्शनाखाली जवान रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून कमाईची गती पकडली आहे. (SRK Jawan Movie) या चित्रपटाने आपल्याच कलेक्शनचे रेकॉर्ड तोडून इतिहास घडवला आहे. चित्रपटाने देश आणि जगात धुमाकूळ घातला आहे. रविवारी शाहरुख खानच्या या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ८१ कोटी रुपये कमावले. 'जवान'ने रिलीजच्या चौथ्या दिवशी रविवारी हिंदी भाषेक किती कोटींचे कलेक्शन केलं आहे. (SRK Jawan Movie)

चित्रपटाने भारतात ७५ कोटींची ओपनिंग केली होती. ज्यामध्ये ६५.५ कोटी हिंदी आणि अन्य तमिळ आणि तेलुगु व्हर्जनने कमावले होते. शुक्रवारी चित्रपटाने ५३.२३ कोटी आणि शनिवारी ७७.८३ कोटींचे कलेक्शन केलं. आता चौथ्या दिवशी रविवारचे आकडे समोर आले आहेत.

ट्रेंड रिपोर्टनुसार, 'जवान'ने रिलीजच्या चौथ्या दिवशी ८१ कोटींचे कलेक्शन केलं. यामध्ये हिंदी भाषेत चित्रपटाने ७२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. एकूण कलेक्शन जवळपास २८७ कोटी रुपयांचे झाले आहे.

'जवान' पहिल्या आठवड्यात गदर २ चा रेकॉर्ड तोडणार?

'जवान'च्या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटपर्यंत सनी देओलच्या 'गदर २' ने ५०० कोटी रुपयांचे रेकॉर्ड तोडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news