Asia Cup 2022 : अफगाण विरुद्ध नाणेफेक जिंकत श्रीलंकेने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Asia Cup 2022 : अफगाण विरुद्ध नाणेफेक जिंकत श्रीलंकेने घेतला गोलंदाजीचा निर्णय
Published on
Updated on

शारजाह; पुढारी ऑनलाईन : आशिया चषकातील (Asia Cup 2022) सुपर ४ मध्ये यजमान श्रीलंकासंघ पुन्हा एकदा अफगाणिस्ताशी भिडत आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत अफगाणिस्तानला फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले आहे. ग्रुप २ मधील साखळी सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत केले. यानंतर सुपर ४ मध्ये पुन्हा एकमेकांशी भिडत आहेत. श्रीलंकेला या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करणे प्रतिष्ठेचे बनले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने श्रीलंके बरोबरच आपल्यापेक्षा बलाढ्य असणाऱ्या बांगला देशला सुद्धा पराभूत केले आहे. त्यामुळे याच आत्मविश्वासाने अफागणिस्तान मैदानात उतरत श्रीलंकेवर दबाव कायम ठेवणार आहे.

आशिया चषकातील (Asia Cup 2022) पहिल्या साखळी फेरीत ग्रुप ए मधून भारत, पाकिस्तान तर ग्रुप बी मधून अफगाणिस्तान व श्रीलंका हे संघ सुपर ४ मध्ये दाखल झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघांनी सुपर ४ मध्ये प्रवेश केला. दरम्यान साखळी सामन्यात भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँग यांचा पराभव केला. तर पाकिस्तानने हाँगकाँगचा पराभव करत व भारता विरुद्ध हार पत्करुन सुपर ४ मध्ये स्थान मिळवले.

ग्रुप बी मध्ये दुबळ्या अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बलाढ्य श्रीलंकेला व बांगला देशला पराभूत करत प्रथम सुपर ४ मध्ये पोहचणार संघ ठरला. तर श्रीलंकेने अफगाणिस्ताकडून पराभव स्विकारत व बांगला देशचा पराभव करत सुपर ४ राऊंड गाठले. आशिया चषकाचा यजमान असणारा श्रीलंका आज अफगाणिस्तानला पराभूत करुन साखळी सामन्यातील पराभवाचा बदला घेईल अशी अपेक्षा आहे.

अफगाणिस्तान संघ : हजरतुल्ला झजाई, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जारदान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला जारदान, करीम जनात, समिउल्ला शिनवारी, रशीद खान, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी

श्रीलंका : पथुम निसंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरिथ असलंका, दनुष्का गुणथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थिक्क्षना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news