हेमंत सोरेन यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी

Hemant Soren
Hemant Soren

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रांची येथील विशेष 'पीएमएलए' न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज (दि.१५) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ३१ जानेवारी रोजी जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्‍यांना अटक केली होती. ( Special PMLA court in Ranchi sends Former Jharkhand CM Hemant Soren to Judicial custody )

 अटकेनंतर सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडीत सुनावण्यात आली होती. या कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. रांची येथील आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्‍यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली होती. आज पीएमएलए न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी रांचीमधील बडगई भागातील लष्‍कराच्‍या मालकीच्‍या ४.५५ एकर जमिनीच्‍या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना १४ ऑगस्ट २०२३ रोजी पहिले समन्स जारी केले होते. यानंतर सोरेन यांना सात समन्स बजावले होते पण ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. अखेर २० जानेवारीला आठव्‍या समन्सनंतर त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. यामध्‍ये २०११ बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news