पुढारी ऑनलाइन डेस्क : Spain Court : स्पेनच्या न्यायालयाने एका पुरुषाला त्याच्या विभक्त पत्नीला 2 लाख युरो देण्याचे आदेश दिले आहे. याचे कारण स्पष्ट करताना तीने 25 वर्ष घर सांभाळले, घरातील या कामासाठी तिला मोबदला म्हणून ही रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. ही रक्कम पती-पत्नीच्या वैवाहिक कार्यकाळात पुरुषाने दरमहा कमावलेल्या किमान वेतनाच्या कागदपत्रांच्या आधारे ही रक्कम ठरवण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
Spain Court : दक्षिण अंडालुसिया प्रदेशातील न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे या पुरुषाला त्यांच्या वैवाहिक जीवनात वार्षिक किमान वेतनावर आधारित आकृतीची गणना करून विभक्त पत्नीला 204624.86 युरो म्हणजेच भारतीय चलनात ही रकम 1 कोटी 76 लाख 93 हजार 610.32 इतकी होते.
Spain Court : या जोडप्याला दोन मुली होत्या. त्यांचे वैवाहिक जीवनाच्या एकूण संपत्तीच्या पृथक्करणाद्वारे हे लक्षात येते की दोन्ही पक्षाने जे काही कमावले ते त्यांचे एकट्याचे होते. त्यामुळे या प्रकरणात पत्नीला अनेक वर्षांच्या भागीदारीतून मिळवलेल्या संपत्तीत काहीही मिळालेले नाही.
या निर्णयात म्हटले आहे, Spain Court : पत्नीने स्वतःला "मूलत: घरात काम करण्यासाठी समर्पित केले होते, ज्याचा अर्थ घर आणि कुटुंब आणि त्यात समाविष्ट असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे होते." तसेच या विभक्त पतीला त्यांच्या मुलींसाठी मासिक बालसंगोपन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते. दोन मुलींपैकी एक 18 वर्षांची आहे तर एक अपल्पवयीन आहे.
या महिलेने स्पेनच्या कॅडेना सेर रेडिओशी बोलताना सांगितले की, तिच्या पतीची तिने घराबाहेर काम करावे, अशी इच्छा नव्हती. असे असले तरी त्याने तिला तिच्या मालकीच्या जीममध्ये काम करू दिले. तिने त्या जीममध्ये जनसंपर्क आणि मॉनिटर म्हणून तिने काम केले. त्या शिवाय तीने स्वतःला केवळ घरकामासाठी समर्पित केले आहे. ती म्हणाली की मी पती आणि कुटुंबाची काळजी घेतली आहे. तसेच ती असेही म्हणाली वैवाहिक जीवनात पतीने मला घरगुती कामे करण्याची विशिष्ट भूमिका घेण्यास भाग पाडले. इतके की मी अशा ठिकाणी होते जिथे मी खरोखर दुसरे काहीही करू शकत नव्हते.
हे ही वाचा :