space : जेव्हा अंतराळ स्थानकावर घुसला होता ‘गोरिला’!

space : जेव्हा अंतराळ स्थानकावर घुसला होता ‘गोरिला’!
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः पृथ्वीच्या कक्षेत भ—मण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनेक गमती जमती तेथील अंतराळवीर शेअर करीत असतात. अशा ठिकाणी एखादा गोरिलाही घुसखोरी करील याची अर्थातच आपण कल्पना करणार नाही. मात्र, एकदा असा गोरिला तिथे आला होता आणि त्याने अंतराळवीर टीम पेकचा पाठलाग करून त्याला दहशतीत आणले होते! (space)

ही घटना 2016 मधील आहे. त्यावेळी या 'गोरिला'ने टीमची 'पळता भुई थोडी'; नव्हे 'उडता अंतराळ (space) थोडे' अशी अवस्था केली होती. अर्थातच हा गोरिला खरा नव्हता तर अंतराळवीर मार्क केली याने गोरिलाचा वेश परिधान केला होता. त्याचा मजेशीर व्हिडीओ आता शेअर करण्यात आला आहे.

अंतराळ स्थानकावर हा गोरिला सूट कुणालाही पूर्वकल्पना न देता पाठवण्यात आला होता. मार्कनेही याबाबत कुणाला काही सांगितले नव्हते. एकदा त्याने गुपचूपपणे हा सूट परिधान केला आणि कामात मग्‍न असलेल्या टीम पेकला घाबरवले.

अचानक अंतराळ स्थानकात आलेल्या या गोरिलाने टीम थक्‍कच झाला व तो शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत हात-पाय हलवत उडू लागला. त्याचा व्हिडीओ पाहून आता अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा सूट अंतराळ स्थानकावर पाठवण्यासाठी 'नासा'ला पाच हजार डॉलर्स खर्च करावे लागले होते. स्कॉट ज्यावेळी एक वर्षासाठी स्पेस स्टेशनमध्ये गेले होते त्यावेळी हा सूट पाठवण्यात आला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news