Passport : केवळ ५०० लोकांकडे आहे ‘हा’ सर्वात दुर्लभ पासपोर्ट

Passport : केवळ ५०० लोकांकडे आहे ‘हा’ सर्वात दुर्लभ पासपोर्ट

वॅलेटा : जगातील सर्वात मजबूत पासपोर्टची चर्चा नेहमीच होत असते. जपान किंवा जर्मनीच्या पासपोर्टला सर्वाधिक शक्तीशाली पासपोर्ट मानले जाते. जपानचा पासपोर्ट असलेले लोक 153 देशांमध्ये व्हिसाशिवायच जाऊ शकतात. मात्र, कधी जगातील सर्वात दुर्लभ पासपोर्टबाबत तुम्ही ऐकले आहे का? हा पासपोर्ट आहे 'सोविरन मिलिट्री ऑर्डर ऑफ माल्टा'चा. तिला स्वतःची भूमी नसली तरी त्याच्याकडे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यवेक्षकाचा दर्जा आणि स्वतःचे संविधान आहे!

ऑर्डर ऑफ माल्टाकडे स्वतःचा एकही रस्ता नसला तरी त्याच्याकडून मोटारींचा नंबरही जारी केला जातो. त्यांचे स्वतःचे चलन आणि पासपोर्टही आहे. 'ऑर्डर ऑफ माल्टा'ने दुसर्‍या महायुद्धानंतर आपला राजनैतिक पासपोर्ट विकसित केला. सध्या या देशाचे सुमारे 500 राजनैतिक पासपोर्ट आहेत. त्यामुळे त्याला सर्वात दुर्लभ पासपोर्ट मानले जाते. हा पासपोर्ट संघटनेचे सदस्य, वेगवेगळ्या मोहिमांचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला आहे.

या लाल रंगाच्या पासपोर्टवर सोनेरी अक्षरात फ्रेंच भाषेत संघटनेचे नाव लिहिण्यात आले आहे. माल्टा ऑर्डरचे अध्यक्ष डी पेट्री टेस्टाफेराटा यांनी म्हटले आहे की, ऑर्डर त्यांच्या सरकारच्या सदस्यांना त्यांच्या कार्यकाळापर्यंतचा पासपोर्ट देते. 'ऑर्डर ऑफ माल्टा'कडून जगभरात मानवतावादी कार्ये केली जात असतात. या संघटनेकडून 120 पेक्षा अधिक देशांमध्ये डॉक्टर, नर्सेस व अन्य सामाजिक सेवा पुरवल्या जातात. युरोपमध्ये भूमध्य सागरात 'माल्टा' नावाचा एक बेटवजा देशही आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news