पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने ( Tamannaah Bhatia ) 'जपान'च्या ट्रेलर लाँच झाला. यादरम्यान तिच्या ७५ चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि कार्ती शिवकुमार सोबतच्या तिच्या बाँडबद्दल खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
संबंधित बातम्या
तमन्ना भाटियाने ( Tamannaah Bhatia ) तिच्या आगामी चित्रपट 'जपान' च्या ट्रेलर लाँचमध्ये सहभाग घेतला. या चित्रपटात तमन्ना साऊथ स्टार कार्ती शिवकुमार आणि अनु इमॅन्युएल सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'जपान' ट्रेलर लाँच दरम्यान तमन्नाने तिच्या ७५ चित्रपटांच्या शानदार कारकिर्दीबद्दल अनेक खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
'पैया' मध्ये काम करताना तिला तमिळ शिकवणाऱ्या कार्ती शिवकुमार बद्दल तिने मनापासून आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. चित्रीकरणाचा अनुभव खरोखरच संस्मरणीय बनवल्याबद्दल तिने कार्तीचे आभार मानले.
'जपान' चित्रपटासोबत तमन्नाकडे 'बांद्रा' हा चित्रपट आहे. तिचा आगामी तमिळ चित्रपट 'अरनमानाई ४' हा २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. तर निखिल अडवाणीच्या 'वेद' मध्ये तमन्ना काम करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात ती बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.