Sourav Ganguly : सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोशिएशन अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

Ganguly On BCCI'S Decision
Ganguly On BCCI'S Decision

पुढारी ऑनलाईन डेस्क : सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. सौरव गांगुली हे यापूर्वी बंगाल क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष होते. २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांनी बंगाल क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्षपद संभाळले होते. दरम्यान सौरव गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या बंगाल क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया हे आहेत. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. अशातच सौरव गांगुली हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. (Sourav Ganguly)

बीसीसीआय अध्यक्षपदचा कार्यकाळ संपणार (Sourav Ganguly)

सौरव गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांची १८ ऑक्टोंबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष होणार आहेत. तर बीसीसीआयच्या सचिवपदी जय शहा कायम राहतील.

असे आहे सौरव गांगुली यांचे करियर

भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी सौरव गांगुली हे एक आहेत. त्यांनी ४९ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ७२१२ धावा आहेत. ज्यामध्ये १६ शतक आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,३६३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ शतक आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. (Sourav Ganguly)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news