MyLek : आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ यादिवशी भेटीला

mylek movie
mylek movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या'मायलेक' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. (MyLek) येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर दिग्दर्शिका आहेत. तर या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत. (MyLek)

संबंधित बातम्या –

आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

चित्रपटाबद्दल निर्माती सोनाली खरे म्हणाली, " आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणही आहेत. प्रत्येक आईमुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले."

दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणतात, " हा विषय खूप संवेदनशील आहे. विशेषतः मुली जेव्हा वयात येतात. त्यावेळी आई आणि मुलीचे नाते खूपच नाजूक वळणावर असते. यात एकतर मुलगी आणि आई मैत्रिणी तरी होतात किंवा मग त्यांच्यात नकळत दुरावा तरी निर्माण होतो. मग अशा वेळी दोघीनींही एकमेकींना समजून घेणे गरजेचे आहे. विषय जरी नाजूक असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news