Sonam Kapoor Selfie : सोनम कपूरचा बेबी बंपसह मिरर सेल्फी व्हायरल!

Sonam Kapoor Selfie : सोनम कपूरचा बेबी बंपसह मिरर सेल्फी व्हायरल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर बेबी बंपसह एक मिरर सेल्फी (sonam kapoor selfie) शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे. सेल्फीच्या काही तासांपूर्वी सोनमने तिचा नवरा आनंद आहुजा सोबतची एक क्लिप देखील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले होते.

सोनम कपूरचा (sonam kapoor selfie) हा फोटो इंस्टा बॉलिवूडच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये सोनमने ब्लॅक वनपीस स्लीव्हलेस ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. सोनमने ड्रेसखाली स्नीकर्स लावले आहेत, जे तिला आणखी स्टाईलिश बनवित आहे. सोनमने तिचे बेबी बंप दिसावे यासाठी खूप गोंडस पोज दिली आहे. पोस्टला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट प्राप्त झाल्या आहेत.

सोशल मीडिया युजर्स सोनम कपूरच्या (sonam kapoor selfie) फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करीत आहेत. एका युजरने कमेंट दिली आहे की, 'सोनम अनुष्का शर्मासारखी दिसत आहेस', त्यानंतर दुसर्‍या एका युजरने म्हटलं की, 'बॉलिवूडची नेक्स्ट स्टाईलिश मम्मी'. त्याच वेळी, अजून एक चाहता कमेंट करतो की, 'निश्चित मुलगी होईल'.

सोनम कपूर सध्या प्रेग्नेंसीचा भरपूर आनंद घेत आहे. ती बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ती सध्या काय करते याचे अपडेट देत असते. चाहतेही तिच्या पोस्टवर कमेंट करून तिचे कौतुक करत असतात. तिला आरोग्याची काळजी घे असा प्रेमाचा सल्लाही देतात. सोनमने शेअर केलेल्या फोटोवर तर लाईक्सचा पाऊस पडतो. सोनम आणि आनंद आहुजा हे जोडपे त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्माची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सोनम कपूर तिच्या प्रेग्नेंसीतील आनंदी क्षणांचे अनेक फोटो शेअर करत राहते, ज्यानंतर तिच्यावर चाहते भरभरून प्रेम लुटतात. काही दिवसांपूर्वी सोनमने असाच बेबी बंपसह फोटो शेअर केला होता. ज्यात ती तिच्या पतीच्या मांडीवर डोके ठेवून मजामस्ती करताना हा फोटो फारच रोमँटिक होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news