Honey Singh : ९ वर्षांची प्रतीक्षा संपली, यो यो हनी सिंगच्या ‘कालास्टार’ चा टीझर रिलीज

Honey Singh
Honey Singh

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि यो यो हनी सिंग ( Yo Yo Honey Singh ) यांचा आगामी 'कालास्टार' चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात एक दोन नाही तर तब्बल नऊ वर्षानंतर सोनाक्षी आणि हनी सिंग एकत्रित दिसणार आहे. या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. याआधी सोनाक्षी- हनी सिंग २०१४ रोजीच्या 'देसी कलाकार' चित्रपटातील एका गाण्यात एकत्रित दिसले होते. यातील दोघांची जोडी चाहत्यांच्या पंसतीस उतरली होती. यानंतर आता 'कालास्टार' चित्रपटात दिसणार आहेत.

संबधित बातम्या 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी 'कालास्टार' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 'देसी कलाकार' गाण्याच्या कथेच्या शेवटी हनी सिंगला पोलिस पकडून घेऊन जातात. तर दुसरा भागात त्याचा जेलमध्ये गेल्यानंतरचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

यात पहिल्यांदा हनी सिंग ( Yo Yo Honey Singh ) जेल असून त्याच्या रूमच्या वरच्या बाजूस असलेल्या लोखंडी गजाला धरून व्यायाम करताना दिसतोय. यानंतर जेलमधील एक व्यक्ती जेलचा दरवाजा उघडून त्याच्याकडे येते. यानंतर त्याच्या हाताला हातकढी घालून त्याला घेवून जाते. थोड्या वेळाने त्याला त्याच्या कपड्यानी भरलेला बॉक्स दिला जातो. आणि शेवटी तो जेलमधून बाहेर पडतो आणि त्याच्या साथीदाराला भेटतो. यासोबत तो त्याची मैत्रीण सोनाक्षीची चौकशी करून तिच्याकडे जाण्याचा निर्णय करतो. यानंतर सो त्याचा मित्र कारमधून निधून जाताना दिसतात. दरम्यान एका सीनमध्ये सोऩाक्षी त्याच्यावर बंदुक रोखताना देखील दिसत आहे. असे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

या टीझरच्या कॅप्शनमध्ये '९ वर्षे झाली पण प्रतीक्षा संपली! #YoYoHoneySingh #Kalaastar चे अनावरण करण्यासाठी सज्ज आहे, दुसरा अध्याय फूट. आता टीझर आऊट'. असे लिहिले आहे. हा टीझर सोशल मीडियावर रिलीज होताच अनेकांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. हनी सिंगचा मित्र मधुकांत सहगल यांनी कॉमेन्टसमध्ये 'सुपर डुपर हिट सुपरस्टार'. असे लिहिले आहे. यावर उत्तर देताना हनी सिंग 'भाऊ, ही तुझी बर्थडे गिफ्ट आहे'. असे म्हटलं आहे. तर चाहत्यासोबत गायक मनशील गुजराल आणि दिग्दर्शक उमेश शर्मा यांनीही आनंद व्यक्त केला.

सोनाक्षी सिन्हा सध्या मालदिवमध्ये असून सुट्यांचा आनंद घेत आहे. सोनाक्षी आगामी 'काकुडा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख आणि साकिब सलीम दिसणार आहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news