पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात काल १६ सदस्यांची एंट्री झाली. १०० दिवस आपल्या माणसांशिवाय, कुठल्याही करमणूकीच्या साधनांशिवाय राहायचे म्हणजे सोपं नाहीये. या घरात क्षणोक्षणी आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण येणे सहाजिकच आहे. आज किरण माने, योगेश जाधव आणि विकास सावंत या तिघांमध्ये चर्चा रंगताना दिसणार आहे. त्या चर्चे दरम्यान विकास असं काही सांगून गेला ज्यामुळे योगेशला अश्रू अनावर झाले.
योगेश किरण माने आणि विकासला सांगताना दिसला, "आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत… आपण स्पेशल आहे, महादेवाने आपल्याला हि ऍबिलिटी दिली आहे याचा फायदा आपण करून घ्यायचा. विकास पुढे म्हणाला, बिग बॉसमध्ये आपण आलो म्हणजे आपण खास आहोत. किरण माने त्यावर म्हणाले,"काही जणांना त्यांचा संघर्ष बघून बोलावलं आहे. विकास म्हणाला काल सामान भरताना मला माझी आई आठवली, हे ऐकून योगेशला त्याचा आईची आठवण आली आणि त्याला रडू कोसळले. या घरात प्रत्येकाला आपल्या माणसाची आठवण येते. पण, घरातले सदस्यचं एकमेकांचा आधार बनतात, त्यांचे मनोबळ वाढवतात, त्यांना धीर देतात.