राजकारणात काहीजण फक्त शो मॅन : विरोधी पक्षनेते अजित पवार

राजकारणात काहीजण फक्त शो मॅन : विरोधी पक्षनेते अजित पवार

श्रीगोंदा : पुढारी ऑनलाइन : 

गणेश उत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते  माध्यमांशी  बोलत होते. यावेळी मा.आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, दादासाहेब कळमकर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक ठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भेटी देत असून गणेशाच्या दर्शनापेक्षा शो ला जास्त महत्व देत आहेत.

शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील… मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात ते सगळ्यांनी पाहिलं आहे…ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची आहे.

काँग्रेसचे आमदार फुटणार याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची भेट झालेली नाही.सध्या मीडियाला कोणत्याही बातम्या नाहीत म्हणून अशा बातम्या दिल्या जात असल्याचे पवार म्हणाले. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का? याचा विचार व्हायला हवा असं अजित पवारांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news